केहरीटोला ते म्हशीटोला सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या रस्त्याचे उच्चस्तरीय चौकशी करा

Thu 13-Feb-2025,02:12 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सार्वजनिक बांधकाम विभागा सह जन लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष 

सालेकसा:महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये समृद्धी महामार्गाच्या एक नवीन रस्त्याच्या कामांना वेग आलेला आहे आणि ग्रामीण भागात आजही सिमेंट रोड ऐवजी डांबरीकरण रस्त्याचे काम सुद्धा जोमात सुरू आहेत मात्र महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर विभागातील गोंदिया विदर्भ या भागात सालेकसा तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत केहरीटोला ते म्हशीटोला पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे परंतु सदर डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने याच्या करणारे ग्रामस्थ सुद्धा हैराण झाले असून शासन प्रशासन कंत्राटदार कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता यांच्या प्रति रोज व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे शासन व सार्वजनिक बांधकाम विभाग हे सालेकसा तालुका करिता सर्वाधिक निधी दिला जातो परंतु आजही स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर कंत्राटदार हे गोंदियावरून कामकाज पहात असल्यामुळे येथील कनिष्ठ अभियंता व उपविभागीय अभियंता हे कंत्राटदार यांच्यासोबत साठे लोटे करून कामावर दुर्लक्ष केला जात असून या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने पन्नास लाख रुपये निधी दिलेला आहे व यासाठी 1200 मीटर लांबी असून 300 मीटर चवळीकरण सुद्धा आहे परंतु प्रत्यक्षात तीनशे मीटर ऐवजी बऱ्याच ठिकाणी अडीचशे पावणे तीनशे मीटर काम केले जात असल्यामुळे कंत्राटदार हे कनिष्ठ अभियंता यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे हे त्यांच्या अधिनस्त असताना सुद्धा त्यावर कनिष्ठ जनता काहीच बोलायला तयार नाही उलट उभे राहून काम पाहत आहेत असी चर्चा सुद्धा संपूर्ण परिसरात पसरलेली असून कनिष्ठ अभियंता यांच्यासोबत कंत्राटदार हे लिप्त असल्याची चर्चा सध्या संपूर्ण तालुका सह आपल्या भागात पसरली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे जवळपास 100 कामे असतील त्यापैकी आजही आपलाच सालेकसा तालुक्यात 70% कामे हे बोगस झाल्याचे निदर्शनात आले असून बऱ्याच यंत्रणा काम करत असतात परंतु डांबरीकरण झाल्यावर किंवा बोगस काम करण्याच्या पूर्वीच कंत्राटदार व अधिकारी आपला कमिशन व परसेंटेज कापून काम करायला सुरुवात करत आहेत बऱ्याच रस्त्याचे काम करताना दोन्ही साईडला मुरूम टाकण्यात येत नाही व मातीच्या मुरुम ऐवजी मातीच्या सुद्धा वापर केला जातो यावर जन लोकप्रतिनिधी व शासन प्रशासनाने कुठेतरी आडा घालावे असे मागणी सुद्धा केली जात आहे सदर केहरीटोला व मासिटोला हे गाव आदिवासी क्षेत्रात असून सुद्धा स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे पदाधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सुद्धा प्रत्येक हे क्रिया घेण्यास फोन केला तर ते कसल्या प्रकारे प्रतिसाद देत नसून फोन उचलत नाही व जर उचलला ही तर कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देऊन प्रतिक्रिया बरोबर देत नाही कार्यकारी अभियंत सुद्धा फोन उचलत नाही तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे सुरू आहेत,यामध्ये पुलिया रोड रस्ते नाली यांच्यासह इतर कामे सुद्धा सुरू असताना काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे सदर या कामाकडे व केहरीटोला येथील होत असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या चौकशी करण्यात यावी व दोषी कंत्राटदार कनिष्ठ अभियंता कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे.