एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन आरोपी चंद्रपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात

Wed 12-Feb-2025,06:05 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर: एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन आरोपींना चंद्रपूर शहर पोलीसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.१० फेब्रुवारी चे रात्री चंद्रपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके सह गुन्हे शाखा पथक चे पोलिस उपनिरीक्षक संदिप बाच्छिरे व पथक चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन हद्दीत कोंबीग ऑपरेशन राबविण्यातकरीता पेट्रोलीग करीत असताना काही इसम राजीव गांधी इंजीनियरिंग काॅलेज समोरील उद्यानात एटीएम फोडुन चोरी करण्याचा कट रचित बसले आहे.अशी माहिती मिळाल्याने सदरच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता पोनी प्रभावती एकुरके व पोलिस स्टाॅप लागलिच घटनास्थळी पोहोचले असता तेथुन तिन इसम पळून गेले, पोलिसांनी पाठलाग करुन दोन इसमांना पकडून त्याची अधिक चौकशी केली.असता सत्यविर अनवसींग सिंह (२१) रा.ब्राहिमपुर, जि. फतेहपुर (उत्तर प्रदेश), दिपांशु राजकरण पटेल (१९) रा. बलीयारपुर, जि. बांधा (उत्तर प्रदेश) असे नाव सांगितले. त्यांचे कडून गुन्हा करताना वापरले जाणारे साहीत्य जप्त करून आरोपी विरुध्द पोस्टे अप क्रं १०३/२५ कलम ३१०(४) अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक केले. आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी आदीलाबाद, करीमनगर,मध्य प्रदेश, भद्रावती (चंद्रपुर) येथे एटीएम मध्ये चोरी केल्याची कबुली दिली असुन अधीक तपास सुरू आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके,पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे,पोहवा सचीन बोरकर,पोहवा संतोषकुमार कणकम,मपोहवा भावाना रामटेके,नापोका कपुरचंद खरवार,पोशि इम्रान खान,पोशि दिलीप कुसराम,पोशि रूपेश रणदिवे,पोशि राहुल चितोडे, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली. सदर गुन्हयाचे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे करीत आहेत.