बल्लारपूर शहरात एका युवती बरोबर गैरवर्तन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : शहरातील नवीन बस स्टँड येथे एका इसमाने कॉलेज मध्ये जाणाऱ्या युवती सोबत गैरवर्तन केले. युवतीने बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.नवीन बस स्टँड येथे अंदाजे ४५ वर्षीय इसमाने कॉलेज मध्ये जाणाऱ्या युवती सोबत गैरवर्तन केले. सदर इसम युवती ला पाहून हातवारे करत असे. दोन हफ्त्यापूर्वी युवती कॉलेज मध्ये जात असताना नवीन बस स्टँड येथे जवळ बसून हात पकडुन चाय प्याला चाल म्हणून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास बस मध्ये बसली असता आरोपीने खिडकी जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करत होता. सदर बाब युवतीने वडीलास सांगितले. त्यावरून वडिलांनी युवती ला घेऊन १४ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अकबर जाफर खान (४५) याचा विरुध्द कलम ७५(१), ७८(२) बी एन एस २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.