सेलु येथील कार अपघातात शिंदी (मेघे) वर्धा येथील तिन तरुनांचे निधन तर एक गंभीर जखमी

Fri 14-Feb-2025,04:18 AM IST -07:00
Beach Activities

अरबाज पठाण ( वर्धा )

वर्धा - नागपूर महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान कारच्या भिषण अपघाता झाला.शहरातील सिंदी मेघे येथील तीन युवकांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नागपूरकडून वर्धेकडे येत असतांना बेलगांवजवळ झाला. भरधाव वेगाने कारने तीन चार पलट्या घेतल्याने कारमधील युवक जागीच ठार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसऱ्याला उपचारासाठी नेत असतांनाच वाटेत मृत्यू झाला. सर्व मृतक सिंदी मेघे येथील असून मृतकांची नांवे सुशिल मस्के, शुभम कवडू मेश्राम, समिर सुटे असून जखमी युवकाचे नांव धनराज धाबर्डे आहे. या भिषण अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिस घटनास्थळी.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धेला पाठविला असून अपघाताचा पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे.