बीजेपार येथील सिमेंट रस्त्याचे काम बोगस कंत्राटदारासह कनिष्ठ अभियंता लिप्त

Fri 21-Feb-2025,09:00 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

कंत्राटदार,अधिकारी झाले मालामाल,लोकप्रतिनिधी सह वरिष्ठांचे दुर्लक्ष

सालेकसा-महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग एक महत्त्वाचे विभाग म्हणून अस्तित्वात आहे परंतु याचे विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जीवनाला प्रतिनिधी सुद्धा लिफ्ट असल्याचीही चर्चा सध्या जोमात सुरू आहे त्यामुळे कामे करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग बोगस कमी करण्यास नंबर एक वर असून गोंदिया जिल्हातील सालेकसा तालुक्यातील.बीजेपार येथील सिमेंट रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 90 टक्के कामे .निकृष्ट दर्जाच्या बोगस असल्याचेही निदर्शनात आले आहे सिमेंट रस्त्याच्या कामात खाली लोह्याची जाली किंवा चटई टाकण्यात आली नाही जुन्याच सिमेंट रस्त्याला नवीन सिमेंट रस्ता दाखवण्यात आले व बिल काढण्यात येईल इस्टिमेटच्यानुसार काम केले गेले नाही पाणी टाकले जात नाही फक्त वर वर तणश टाकून सिमेंट पाण्याच् झरा मारलेला आहे सदर कामाची लांबी 104 मीटर असून चवळीकरण 3 मीटर आहे आणि या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 लाख रुपये खर्च केले त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर मेहरबान कोण असं संतप्त सवाल हे जनतेकडून केला जात आहे प्राप्त माहितीनुसार कनिष्ठ अभियंता व उपविभागीय अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता हे फक्त कार्यालयातून व फोनच्या माध्यमातून संपर्क करून कामे पहात असतात परंतु प्रत्यक्षात ते कामावर जात नाही त्यामुळे कंत्राटदार हे गैरफायदा घेऊन शासनाच्या पैशावर डल्ला मारत असतात यामध्ये अधिकारी सुद्धा लिप्त असून त्यांच्याकडून परसेंटेज कमिशन घेऊन कामे बोगस करण्याचही मानस आहे सदर कंटाळदार हे आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे मी गेल्या 40 वर्षापासून ठेकेदारी करत आहे माझे कोणीच काही करू शकत नाही मी अधिकाऱ्यांना पाहून घेईन बिल कसं निघत नाही तर.असे शब्द कंत्राटदार बोलत आहे.यावरून असे दिसते की कंत्राटदार हे अधिकारी यांच्यावर भारी पडत आहे आजच्या घडीला रेती छत्तीसगड राज्यातून मोठ्या जोमाने येत आहे व काही दलाल व एजंट सुद्धा सक्रिय झालेले असून विना रॉयल्टी कसं काय सुरू आहे असा संतप्त सवाल ही उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात अधिक माहिती घेत असताना कनिष्ठ अभियंता हे उडवा उडवी चे उत्तर देऊन उपविभागीय अधिकारी हे फोन उचलत नाही तसेच कार्यकारी अभियंता सुद्धा फोनवर कसलाही प्रतिसाद देत नाही त्यामुळे कुठेतरी कंत्राटदार व अधिकारी यांच्यामध्ये संगणमत असल्याचे आरोप केला जात आहे सदर बीजेपार येथील सिमेंट रस्त्याच्या बोगस कामाची, व केहरीटोला मसीटोला येथील.50 लाखाच्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाची सुद्धा उच्चस्तरी चौकशी करून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री पालकमंत्री आमदार खासदार जनलोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष केंद्रित करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे.

प्रतिक्रिया

याविषयी अधिक माहिती घेतली असता बीजेपार येथील सिमेंट काम सुरू असताना नागरिकांचे कदाचित येणं जाणं सुरू असेल त्यामुळे कुठेतरी सिमेंट रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत तरी मी संबंधित कंत्राटदार यांना फोनवर बोलणे करून पुन्हा त्या सिमेंट रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्याचे कंत्राटदार यांना सांगितले आहे

अमोल हजारे कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सालेकसा

बॉक्स

यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांच्याकडून अनेकदा फोन केला केले जातात परंतु ते कधीच फोनवर प्रतिक्रिया किंवा फोन उचलत नसल्यामुळे कुठेतरी कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांच्यामध्ये साटलोटे व मोठ्या प्रमाणात संगणमत असल्याचेही चर्चेला सध्या उधाण आले असून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सार्वजनिक विभागाचे बोगस काम केल्याचेही निदर्शनात येत आहे त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे.