अवैध सट्टापट्टीवर धडक कारवाई बारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Sun 16-Feb-2025,08:38 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी शारुखखान पठाण वरोरा

वरोरा :- चंद्रपूर जिह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अध्यक्ष मुमक्का सुदर्शन सा.यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानीय गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले. दि. 15 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्याआधारे वरोरा येथे अवैध सट्टापट्टीवर धडक कारवाई करून 11 गुन्ह्यात 12 आरोपींना ताब्यात घेऊन एकूण 4 लाख 22 हजार 820 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली. वरोरा शहरात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात सुरू असलेल्या अवैधरित्या सट्टापट्टी वर वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सट्टापट्टी चालविणाऱ्या एकुण १२ इसमाना ताब्यात घेवुन त्यांचेवर वरोरा पोलीस स्टेशन येथे वेगवेगळे ११ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नगदी रूपये २२ हजार ८२० रुपये व ८ मोटार सायकल किंमत ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख २२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भूरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार व पोलीस स्टॉफ सर्व स्थानिक गुन्हे शाख, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.