ट्रक दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Sun 16-Feb-2025,08:42 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा 

वरोरा :- वरोरा येथील रहिवाशी असलेले गिरिष अशोक ढवस वय 25हे आपल्या MH 34BX8641या दुचाकी वाहनाने भांदेवडा येथे जगन्नाथ महाराजांचं दर्शनासाठी जात असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रक क्र MH 34BG 7001याने जोरदार धडक दीली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना 16 फेब्रु ला दुपारच्या सुमारास घडली 16फेबृ. जगन्नाथ महाराजांचं प्रगटदिवस या दिवशी अनेक भक्त दर्शनासाठी भांडेवडा येथे जातात, नेहमीप्रमाणे गिरीष ही दर्शनाला वणी येथे जात असताना काळाने त्यावर झडप घातली, विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर ने दुचाकी वाहन वर ट्रक चढवला त्यात गिरीष अशोक ढवस याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की मृतकाचे शिर धडावेगळे झाले होते. ही घटना झाल्यावरही ट्रक ड्राइवर राजकुमार दशरथ कैथल हा एकोना कोळसा खानित कोळसा भरण्यास गेला तेंव्हा नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रुत्त लीहेपर्यंत आरोपी ला अटक करण्यात आली नव्हती, पोलिसांनी कलम 281,125(ब)106(1) बि एन एस नुसार गुन्हा नोंदविला, सदर ट्रक जाकिर खान याच्या मालकीचा आहे, मृतकाचे शव विच्छेदन उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे करण्यात आले, यावेळी असंख्य नागरिकांची एकच गर्दी परिसरात होती.वरोरा शहराला लागून असलेल्या एकूण कोळसाखानीमध्ये माजरी वनी येथील अनेक व्यावसायिक या ठिकाणी उतरलेले असून जास्तीत जास्त कोळसा कसा उचलला जाईल यासाठी यांची नेहमीच स्पर्धा असते या स्पर्धेतूनच हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे