क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Fri 11-Apr-2025,12:48 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव

आमगाव: तालुक्यातंर्गत काळीमाती येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत ११ एप्रिल २०२५ ला शाळेत थोर समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि महिलांच्या हक्कासाठी लढणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक जी.टी. रहांगडाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर भाषणे,कविता,गीतगायन व नाटिकांद्वारे त्यांचे कार्य उजळून दाखवले. विद्यार्थिनींनी 'सावित्रीबाई आणि फुले दांपत्य' या विषयावर विशेष सादरीकरण करून टाळ्यांची दाद मिळवली.या कार्यक्रमाला समुह साधन केंद्र काळीमातीचे केंद्रप्रमुख डी.एस. ढबाले, मुकुंद डोबनेऊके, एम.एम हरीणखेडे, डी.के. मेंढे, कु. के.जी.महादुले, कुमेंद्र बिसने, दुर्गा मेहर, वैशाली उके आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एन.जी.कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद सरवदे यांनी मानले.कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा फुले यांच्या विचारांप्रती निष्ठा ठेवून शिक्षणाचा प्रसार करण्याचा निर्धार करण्यात आला.