जोगीसाखरा येथे महाराजस्व अभियान कार्यक्रम संपन्न;आमदार रामदास मसराम यांची प्रमुख उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी : येथील जोगिसाखरा ग्रामपंचायत कार्यालयात महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार रामदासजी मसराम यांनी भूषविले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजस्व विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व नागरिकांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.यावेळी उपस्थित तहसीलदार आरमोरी उषा चौधरी मॅडम,नायब तहसीलदार आरमोरी वाकुडकर साहेब, श्री दोनाडकर साहेब,जि.प.मुख्याध्यापक जोगीसाखरा हेमके सर, सरपंच जोगीसाखरा संदीप ठाकूर,उपसरपंच शंकरनगर माधवी सरदार,RFO पळसगाव बोरकर साहेब,सरपंच पळसगाव जयश्री दडमल, उपसरपंच पळसगाव सोनी गरफडे,रजनी सतीबावणे ,हरिदास बावणे,दिलीप घोडामरावेशंकर ढोरे,जी.जी.किरंगे,राधा सदमके,सी.एच नागापुरे,जी.एम कुंभरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध प्रलंबित कामांबाबत तक्रारी नोंदविण्यात आल्या व त्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमात स्थानिक अधिकारी,तलाठी,मंडळ अधिकारी तसेच विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.आमदार मसराम यांनी आपल्या भाषणात राजस्व विभागाच्या डिजिटल योजनेचे महत्त्व विशद करताना,गावोगाव लोकाभिमुख सेवा पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले.