होमगार्ड प्रशिक्षण केंद्र, गोंदिया येथे प्रकृती परीक्षण

Thu 27-Mar-2025,07:38 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

गोंदिया:गोदिया जिल्ह्यातील ला एम. एस. आयुर्वेदीक कॉलेज, गोंदिया च्या वतीने होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे प्रकृती परीक्षण शिबिर घेण्यात आले. भारत सरकार व आयुष मंत्रालयाच्या वतीने प्रकृती परीक्षण अभियान राबाविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत रविवार, दि २३ मार्च २०१५ ला १५५ होमगार्ड चे प्रकृती परीक्षण एम. एस. आयुर्वेदीक कॉलेज, गोंदिया च्या NSS स्वंयसेवक मार्फत करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा पोलिस उपनिरिक्षक सुनीता चानपुरकर , डॉ. प्राजक्ता भेलावे, डॉ संदीप दमाहे,शिवशंकर बेमारकार,पवन जगने, रविंद्र मोहितकर,अमित मेश्राम,कमलेश राणे, गीता बल्ले, रामवती बनोटे,ज्योति देशभ्रतार,संध्या तुरकर तसेच १५५ पुरुष व महिला होमगार्ड आणि एन. एस. एस. स्वंयसेवक उपस्थित होते.या शिबिर अंतर्गत उपस्थित होमगार्ड ला प्रकृति परिक्षणाचे महत्व डॉ प्राजक्ता भेलावे यांनी थोडक्यात सांगितली.प्रकृति म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ति विषयानुसार प्रकृति मधला फरक प्रकृति जाणुन घेणे हे त्या व्यक्तिला त्याच्या नैसर्गिक अवस्थेला अनुरूप जीवनशैली निवडण्यास मदत करते,जेणेकरुन भविष्यात आरोग्य राखण्यात मदत होईल,हे डॉ. प्राजक्ता भेलावे यांनी समजावून सांगितले. तसेच डॉ.संदीप दमाहे यांनी आयुष मंत्रालाया द्वारे नवीन लॉन्च केलेल्या प्रकृति परीक्षण मोबाइल अप्लिकेशन बद्दल माहिती सांगून ते कैसे वापरायचे याबद्दल माहिती होमगार्ड ला दिली.या अभियानाचा पहिला टप्पा २९ नोवेम्बर २०२४ ते २५ डिसेंबर २०२४ पर्यंत होता. आता द्वितीय टप्पा सुरु आहे.तरी सामान्य नागरिकास प्रकृति परीक्षण करवायचे असल्यास त्यांनी एम. एस.आयुर्वेदीक कॉलेज च्या स्वंयसेवकांस संपर्क करावा.