बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

Mon 14-Apr-2025,06:05 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी पुष्पहार अर्पण करून केले. या प्रसंगी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, सहाय्यक राजेंद्र गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले,महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलिमा बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सोयाम,पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल कापगाते,पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार सह अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस व होमगार्ड सैनिकांची उपस्थिती होती.