गिरड गावाचे नाव भूषण करणारी माहेश्वरी मंगेश गिरडे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने 25 मार्च रोजी होणार सन्मानित

Fri 21-Mar-2025,08:26 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी विलास लभाने गिरड 

वर्धा:गिरड गावचे नाव लौकिक करणारी युवा स्त्रीचे जनजागरण करणारी माहेश्वरी मंगेश गिरडे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार येत्या 23 मार्च रोजी साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारत इतिहास संशोधन मंडळ 13 21 सदाशिव पेठ पुणे येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार, एका छोट्याशा गावातील बुद्धिमत्तेने महाराष्ट्रात नावलौकिक करणारी माहेश्वरी मंगेश गिरड हिने आपल्या गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सशक्तिकरण वक्तृत्व स्पर्धेमध्ये महिलांसाठी सशक्तिकरण युवा नेतृत्व अशा क्षेत्रांमध्ये योगदान करून आपले नाव लौकिक महाराष्ट्रभर गाजवीत येत्या 23 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला,राज्य शिक्षण सल्लागार डॉक्टर अंजन घवाड मुंबई गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त प्रिया थोरात, भ्रष्टाचार विरोधी विभागाचे मुख्य तपास अधिकारी रामजीत मुझा, साऊज्योती सामाजिक फाउंडेशनच्या उपाध्यक्ष नीलिमा पाटील, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गौरव पुरस्,कार प्रदान केल्या जाणार आहे, या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रा मधून स्वागताचा वर्षाव होत आहे,