वनविभागाच्या कामांवर असलेल्या रोजंदारी मजुरांची मजुरी १० महिन्यांपासून प्रलंबित

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
तातडीने प्रलंबित मजुरी देण्याची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांची मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्या कडे निवेदनातून मागणी.
आरमोरी - वनविभागाच्या विविध शाखेअंतर्गत करण्यात येणारी कामे, वन विभागात विविध क्षेत्रीय घटकांमार्फत वनक्षेत्रांवर वृक्ष लागवड, वनसंवर्धन,वन्यप्राणी संवर्धन आणि व्यवस्थापन यासह कार्य आयोजनेतील व्यवस्थापन आराखड्यातील तरतुदीनुसार कामे केली जातात.वनेतर क्षेत्रासह दुर्गम,आदिवासी भागात रोजंदारीवर कामे कॅम्पा अंतर्गत केली जातात मात्र,प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वनविभागाच्या कामांवर रोजगारीने ३ माही मजुराची मजुरी गेल्या दहा महिन्यांपासून शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे रोजंदारी वनविभागाच्या कामांवर असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे प्रशासनाने तातडीने कॅम्पा योजने अंतर्गत तिमाही अन्य रोजंदारी मजुरांची मजुरी देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी गडचिरोली वनवृत्त प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या कडे निवेदनातून केली आहे.वन विभागातील वनक्षेत्रांवर वृक्ष लागवड, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन आणि व्यवस्थापन यासह कार्य आयोजनेतील व्यवस्थापन वनेतर क्षेत्रासह दुर्गम,आदिवासी भागात रोजंदारीवर कामे कॅम्पा योजनेअंतर्गत केली जातात यात याच तिमाही रोजंदारी वर बरेच मजुराचा कृटुब चालतो परंतु गेल्या दहा महिन्यांपासून कॅम्पा योजनेअंतर्गत रोजंदारी मजुराना मजुरी मिळाली नसल्यामुळे त्यांच्या कृटुबावर उपासमारीची वेळ आली आज पर्यंत आज भेटतील उध्या भेटतील या आशेवर उसने उधार करून रोजंदारी मजुर जिवण जगत असल्यामुळे प्रशासनाने तातडीने कॅम्पा योजने अंतर्गत वनविभागाच्या कामावर तिमाही असलेल्या व अन्य रोजंदारी मजुरांची मजुरी देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी गडचिरोली वनवृत्त प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या कडे निवेदनातून केली आहे.