नगरपरिषदने मालमत्ता धारकांचे ३ दुकान गाळे सील आणि सामानही केले जप्त

Thu 20-Mar-2025,11:10 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

नगरपरिषदेकडून जप्तीची कार्यवाही जोमात

बल्लारपूर : नगर परिषद आर्थिक वर्ष २०२४ -२५ च्या १०० टक्के कर वसुली मोहिमेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नगरपरिषद बल्लारपूर कडून वसुली अभियान सुरू करण्यात आलेले आहे. कर वसुलीसाठी नगर परिषदेकडून वार्डवाडीत वसुली पथके तयार करून वसुली करण्यात येत आहे. मोठ्या थकबाकी धारकांवर विशेषत्वाने कार्यवाही केली जात आहे. आज २० मार्च २०२५ ला थकबाकीदारक मालमत्ता वर कार्यवाही करण्यात आली. त्यात कत्रमवार वार्डातील अख्तर बेगम नासिर बेगम मोहम्मद यांच्या मालकीचे ३ दुकान गाळे सील करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून एक एलजी टीव्ही, सोपासेट, रेडिओ, लाकडी टेबल, होम थिएटर आणि स्पीकर जप्त करण्यात आले.सदर कार्यवाही बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांचे मार्गदर्शनात उपमुख्यधिकारी रविंद्र भंडारवार यांचे नेतृत्वात व प्रयत्न उपस्थितीत करण्यात आले.यावेळी संगिता उमरे,नंदकिशोर सातपुते,अभिजित पांडे, विक्रम लाहोरे,शंकर रामटेके,नरेश दांडगे, मारोती चापले,वसीम खान इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.नगरपरिषदेच्या या कारवाईने शहरातिल थकीत मालमत्ता धारकांमध्ये धास्ती तयार झाल्याचे दिसत आहे.