गडचिरोली प्रीमियर लीग (जीडीपीएल) अंतिम सामना हेरिकेन्सचा थरारक विजय सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचे बहारदार सादरीकरण

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:- १९ मार्च २०२५ रोजी लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने आयोजित गडचिरोली प्रीमियर लीग (जीडीपीएल) २०२५ च्या अंतिम सामन्यात गडचिरोली हेरिकेन्स संघाने शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर गडचिरोली वॉरियर्स पोलीस संघ उपविजेता ठरला. या चुरशीच्या लढतीने प्रेक्षकांनी(मॅच) क्रिकेट चा आनंद घेतला.या बक्षीस वितरण समारंभात भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, तथा खा. डॉ.अशोक नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना गौरविण्यात आले व मान्यवरांसह विजेत्या व उपविजेत्या संघाना बक्षीस वितरण सोहळा करण्यात आले. यावेळी डॉ. नेते यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत, गडचिरोलीतील क्रिकेटला चालना देणाऱ्या या स्पर्धेचे व आयोजकांचे कौतुक केले.स्पर्धेचा रोमांच अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.अंतिम सामना थेट स्टेडियम च्या गॅलरीत बसून पाहण्याचा आनंद मान्यवरांनी व क्रीडारसिकांनी घेतला. गडचिरोली प्रीमियर लीग (जीडीपीएल) मुळे जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाले असून, युवा खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना.आशिष जयस्वाल, माजी मंत्री तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,लाँयड मेटल्सचे व्यवस्थापक व्यंकटेशजी, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,माजी आमदार दिपक आत्राम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे,तसेच मोठ्या संख्येने लाँयङ्स मेटल्सचे पदाधिकारी व खेळाडू श्रोते व प्रेक्षक उपस्थित होते.लॉयड मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या वतीने गडचिरोली येथे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचे बहारदार सादरीकरण!गडचिरोली गडचिरोली एमआयडीसी येथे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुरेल आवाजाने रसिक मंत्रमुग्ध झाले.या भव्य संगीत कार्यक्रमाचा आनंद खा. तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी मान्यवरांसोबत आणि प्रेक्षकांसोबत घेतला.संगीतप्रेमींनी सोनू निगम यांच्या सुरेल गाण्यांचा मनमुराद आनंद घेतला, हा सोहळा गडचिरोली वाशियांशाठी अविस्मरणीय ठरला.