अल्लीपूर येथे स्वामी समर्थ महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

Thu 17-Apr-2025,08:44 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लीपूर )

स्थानिक गळोबा वॉर्ड बैल बाजार जवळ श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी स्वामी समर्थ दिव्य मठ प्रति अक्कलकोट सुरगाणा यांच्या सहाय्याने अल्लीपुर नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ दिव्य मठाची स्थापना करण्यात आली. यावेळी गावातील मुख्य मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तब्बल २० भजन मंडळांनी सहभाग नोंदविला होता शिवदास महाराज वडनेरकर यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रसंगी महंत महाले माऊली यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील काही प्रतिष्ठित नागरीकांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता स्वामी समर्थ मठाचे आयोजन कमिटी चे सदस्य अपर्णा नरड, मंगला शेंडे, अशोक नरड, प्राध्यापक परेश सावरकर, रामदास नरड, माजी ग्राम.प.सदस्य सचिन पारसडे, प्रशांत वांदिले, प्रल्हादजी बालपांडे, शंकर बालपांडे, व इतरत्र सर्व स्वामीभक्त यांनी सहकार्य केले .