अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

Thu 27-Mar-2025,12:28 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा-प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारा संचलित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथे दि. 25 मार्च 2025 रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय आमगाँव खुर्द येथील चमू यामध्ये डॉ.प्रभाकर डोंगरवार दरेकसा,स्नेहा वैरागडे सामुदायिक आरोग्य अधिकारी,मंजू मेंढे आशासेविका व चलीना साखरे आशासेविका हे उपस्थित होते.या आरोग्य तपासणी शिबीर अंतर्गत महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.तसेच या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या रक्त तपासणीच्या वेगवेगळ्या चाचण्या करून त्यांना त्यांच्या शरीराबद्दल अवगत करण्यात आले.या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या रासेयो चमूच्याद्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.मूर्ती यांच्या मार्गदर्शनाने डॉ. संजय बिरनवार यांच्या वतीने करण्यात आले.