शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि जनतेला पिण्याचे पाणी पुरवठ्याकरीता गोसिखुर्द धरणाचे पाणी तात्काळ वैनगंगा नदीला सोडण्यात यावे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी - सध्या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील आणि इतरत्र वैनगंगा नदीच्या पात्र भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम घेतला आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील आणि आरमोरी तालुक्यातील रब्बी पिकांना पाण्याची गरज भासत असल्याने तसेच लगतच्या आरमोरी शहरातील पाणीपुरवठा हा सुद्धा वैनगंगा नदीच्या पात्रातूनच होत असतो परंतु उन्हाळ्याचे दिवस असताना नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने आरमोरी शहरला पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे तात्काळ वैनगंगा नदीला गोसेखुर्द येथील पाणी सोडण्यात यावे.अन्यथा मोठा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात करण्यात येईल असा इशारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.आपला जिल्हा हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे वैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे या नदीच्या काठावर शेकडो एकर शेतजमीन आहे काही शेतकरी उन्हाळी पिके घेतात. तसेच अनेक पाणीपुरवठा योजना या नदीवर आहेत वैनगंगा नदीचे पाणी गोसेखुर्द धरणात अडविले जात असल्याने मार्च महिन्यातच ही नदी आटल्या गत दिसून येत आहे.भर उन्हाळ्यातच पाणीपुरवठा योजना उघड्यावर पडल्यानें गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे येत्या आठ दिवसात गोसिखुर्द धरणातील पाणी तातडीने वैनगंगा नदी पात्राला सोडण्यात आले नाही तर तालुक्यातील गावकरी शेतकरी यांना घेऊन जिल्हा काँग्रेस गडचिरोली आणि तालुका काँग्रेस आरमोरी च्या वतीने मोठा जनआंदोलन उभारण्यात येईल.असा इशारा आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात करण्यात येईल असा इशारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे. यावेळी तालुका काँग्रेस ममिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष निशात वनमाळी जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिल किरमे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज भोयर काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजय सुपारे चंदु टेंभूणे राजु सामृतवार दिवाकर पोटफोडे मनोज बोरकर योगेश चापले हेमराज प्रधान अरुण घोसे आशुतोष भरणे अशोक हारगुडे राहुल धाईत गुणवंत प्रधान यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.