दोनशे रुग्णांनी घेतला निःशुल्क रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ ग्रामपंचायत भजेपार व ब्राह्मणकर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

Wed 09-Apr-2025,01:52 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायत आणि ब्राह्मणकर हॉस्पिटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य उपकेंद्र,भजेपार येथे नुकतेच निःशुल्क रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून जटिल रोगांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.सदर शिबिराचे आयोजन ब्राह्मणकर हॉस्पिटलचे संस्थापक व प्रसिद्ध सर्जन डॉ.नोव्हिल ब्राह्मणकर, ग्रामपंचायत भजेपारचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार,निलेश चुटे चुटे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य वंदना काळे यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. प्रसिद्ध सर्जन डॉ.नोव्हिल ब्राह्मणकर यांच्यासह त्यांची वैद्यकीय टीम डॉ. प्रणय आकरे,राजेश राणे, अजय गौतम,लीना नागरिकर, रंजना नीनावे, नूतन परटेटी,पल्लवी राहडाले,शिवानी नायक यांनी रुग्णसेवा बजावली. दरम्यान आरोग्य उपकेंद्र भजेपारचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश कटरे,आरोग्य सेविका ईशा रहिले, प्रदीप वाघमारे व सर्व आशा सेविकांनीही मोलाचे योगदान दिले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी सुनील शिवणकर, उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर,सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार,राजेश बहेकार,मनीषा चुटे, सरस्वता भलावी,आशा शेंडे,आत्माराम मेंढे, ममता शिवणकर,रोजगार सेवक गोपाल मेंढे, संगणक परिचालक अखिलेश बहेकार, कर्मचारी अतुल मेंढे, अमित ब्राह्मणकर,दागो फुन्ने आदींनी परिश्रम घेतले.या उपक्रमात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती,शाळा व्यवस्थापन समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती,अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष,भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सूर्योदय क्रीडा मंडळ तसेच सर्व महिला व पुरुष बचत गट यांनी सहकार्य करून सामाजिक एकतेचे दर्शन घडविले. शिबिरात स्तन कॅन्सर,बच्चा दानी, पित्ताशय थैली, गर्भाशय गाठ, प्रोस्टेट सर्जरी, पथरी, हर्निया,अपेंडिक्स आदी अनेक रोगावरील उपचार आणि शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत केल्या जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.