जिवंत सातबारा मोहिमेस शेतकऱ्यांनी सहकार्य करा

Sat 29-Mar-2025,05:04 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणाऱ्या कागपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात 1 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीत जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.