पत्रकार शिष्टमंडळांनी दिली केंद्रीय मंत्री सह आदिवासी मंत्री खासदार व आमदारांना निवेदन

Mon 31-Mar-2025,12:12 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा-क्रीडा व युवक संचालनालय मंडळ पुणे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात व ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाबरोबर वयाच्यानुसार वयोवृद्ध तरुण मंडळी यांच्याकरिता कोठेवधी रुपयांची शासकीय प्रशासकीय इमारत बांधकाम केली. आज घडीला इमारतीची किंमत शंभर कोटी ते 200 कोटी एवढी आहे, परंतु आजही स्वातंत्र्याच्या 75 ते 76 वर्षानंतर महाराष्ट्रात क्रीडा संकुल मध्ये काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंज्या मानधनावरच काम करावे लागत असल्याचे चित्र सध्या राज्यात सह जिल्ह्यात दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षापासून क्रीडा संकुल मध्ये काम करत आहेत मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करून घेत असल्यामुळे त्यांच्या परिवारा वर उपासमारीची पाळी सुद्धा आलेली आहे त्यांना सहा महिने ते एकेक वर्ष मानधन मिळत नाही. सदर हे मानधन एका कंपनी मालक किंवा एजन्सीला दिल्याचेही समजले जाते.आज तुटपुंज्या काम करणाऱ्या कामगारांना प्रति दर महिन्याला. सफाई कामगार यांना 1000 हजार,परिचाराला 1000 रुपये तर क्रीडा मार्गदर्शक यांना दोन हजार रुपये तर शिक्षक क्रीडा मार्गदर्शन यांना तीन ते चार हजार रुपये दिले जातात. आज

महाराष्ट्र शासन एकीकडे कोट्यवधी रुपये इमारती करिता खर्च करते परंतु त्या इमारती व येथील कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर आपले महिन्याचे 30 दिवस काढावे लागत आहे. महाराष्ट्रात 350 तालुके असून यामध्ये नगरपालिका महानगरपालिका च्या वेगळा क्रीडा संकुल असल्याची ही माहिती आहे. कदाचित हीच अवस्था तुटपुंज्या या मानधनावर करणाऱ्या कामगाराची असेल अशी सुद्धा चर्चा होत आहे. सदर तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्यांना त्वरित मानधनात वाढ करून द्यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे व या मागणीचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके,केंद्रीय मंत्री दुर्गादास उइके, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव कीरसान, देवरी विधानसभेचे विद्यमान आमदार संजय पुराम यांच्याकडे लेखी पत्र तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामध्ये पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिनेश मानकर, सचिव गुलशन बनोटे, कोषाध्यक्ष रविकुमार सोनवणे माजी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव शेंडे यामध्ये सदस्य प्रकाश टेंभरे, गुणाराम मेहर, संजय बारसे,संतोष पुरी,मायकल मेश्राम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.प्राप्त माहितीनुसार तालुका पत्रकार संघटनेने आमदार संजय पुराम यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्षात भेट घेऊन महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्यात क्रीडा संकुल येतील मानधनावर काम करणाऱ्यांचे मानधन कमी असल्याचे पत्र दिले होते. या पत्राची दखल आमदार पुराम यांनी घेऊन राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिनांक 7 मार्च रोजी पत्रव्यवहार केला आहे त्यामुळे मंत्री महोदय काय निर्णय घेतात याकडे सुद्धा लक्ष वेधले आहेत.

बॉक्स

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता क्रीडा संकुल येथे जवळपास गेल्या 5 ते 6 वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कामगार काम करतात ही अवस्था खूप वाईट आहे.एका क्रीडा संकुल मध्ये जवळपास चार ते पाच कामगार काम करतात परंतु त्यांना मानधन खूप कमी मिळत असल्यामुळे त्यांच् परिवाराचा उदरनिर्वाहच् प्रश्न निर्माण झालेला आहे ते सुद्धा सहा महिने किंवा एक वर्ष मानधन मिळत नाही त्यामुळे जन लोकप्रतिनिधींनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला तर नक्कीच मानधनात वाढ करून कायमस्वरूपी करू शकतात.कमीत कमी कामगारांना पदानुसार मानधन 10000 किंवा 15000 देण्यात यावे-ए.बी.मरसकोल्हे तालुका क्रीडा अधिकारी सालेकसा

बॉक्स

सन 2014 पासून केंद्रामध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यापासून बऱ्याच क्रीडा संकुल मध्ये तुटपुंज्या मानधनावर कामगारांना काम करावे लागत आहे ही एक शोकांतिका म्हणावं लागेल जर सहा महिने व एक वर्ष मानधन त्यांना मिळत नसेल तर त्यांनी आपल् परिवार कसा चालवावा हा सुद्धा प्रश्न मोठा आहे. सदर क्रीडा संकुल येथील मानधनावर काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे व मानधनात वाढ करावी-डॉ.नामदेवराव किरसान खासदार गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र