माणसाप्रमाणे वन्यजीव जगने महत्वाचे- देवानंद दुमाने अध्यक्ष वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :- विश्वामध्ये पर्यावरण व वन्यजीव संरक्षण करण्याच्या उद्देशाने 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.अलीकडच्या काळात वन्यजीवाचे संकट संपूर्ण जगामध्ये दिसून येत आहे. वन्यजीवाचे ठिकाण,भक्ष्य आणि मानवी धोके यामुळे वन्यजीव संकटात सापडलेले आहेत.जागतिक वन्यजीव दिवस निमित्त विविध प्रकारचे प्राणी, पक्षी,पर्यावरण,वृक्ष,झाडे यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे याकरिता जागतिक वन्यजीव दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. नुकत्याच उन्हाळा सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी प्राण्यांना, पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची,खायची सोय नसल्यामुळे अनेक पक्षी, प्राणी तहानेने,भुकेने व्याकुळ होऊन आपले प्राण गमवित असतात. अशा प्राणी, पक्षी यांना माणुसकीची थाप देऊन पक्षी, प्राणी यांना पानवटे,खाद्यान्न यांची सोय करणे निसर्गातील घटक मानव या नात्याने गरजेचे आहे. प्रगतीच्या नावाने सीमेंटच्या जंगलात वाढ होऊन जंगले निर्जन होत चालली आहेत. अलीकडच्या काळात अनेक प्राणी, पक्ष्याच्या जसे गिधाड,घार,सारंग,उदमांजर, उडती खार,सापाच्या विविध प्रजाती ह्या लुप्त झाल्याने निसर्गप्रेमी,वन्यप्रेमी याच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या जागतिक वन्यजीव दिवशी वन्यजीव,पक्षी यांचे संरक्षण कण्याचा निर्धार प्रत्येक नागरिकाने केला तर पक्षी, प्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करून निसर्गाचे संवर्धन करता येवू शकतो. यामध्ये शासन व वन्यप्रेमी यांची भूमिका महत्त्वाची आहे.देवानंद दुमाने अध्यक्ष- वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण.संस्था,आरमोरी जिल्हा-गडचिरोली