२८ एप्रिलला 'सेवा हक्क दिन'

Fri 18-Apr-2025,11:59 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : सुनिल हिंगे (अल्लिपुर )

जिल्ह्यामध्ये ग्रामीण व जिल्हास्तरावर येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला 'सेवा हक्क दिन' साजरा करण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात 'सेवा हक्क दिन' साजरा करण्यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सागर कवडे सर्व विभागा प्रमुख उपस्थित होते.