श्री संत भोजाजी महाराज पुण्यतीथी महोत्सवाला सुरवात

Fri 18-Apr-2025,11:57 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )

जगदगुरु संत भोजाजी महाराज श्री क्षेत्र आजनसरा येथे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने शुक्रवार 18 एप्रिल पासुन ते 25 एप्रिल पर्यंत शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, कै. ह. भ. प. देवाजी महाराज यांनी शके 1877 ईसवी सन 1955 पासून आजनसरा वासियांच्या सहाय्याने पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली, पुण्यतिथी महोत्सवाच्या सुरवातीला शुक्रवारी पहाटे रामाजी बापूरावजी पर्बत यांच्या हस्ते कलश स्थापना व विणा सुरु करुन दैनंदिन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या वेळी विवीध कार्यक्रमाचे आयोजन केले असून पंचक्रोशीतील भविकभक्ताणी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.