आष्टी (अनखोडा) येथे विद्युत तारेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
चामोर्शी :- तालुक्यातील अनखोडा येथे पाणी थंड करणाऱ्या कुलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्याने अनखोडा येथील सोळा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सहा एप्रिल रविवारी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार धीरज प्रमोद येलमुले वय वर्ष (16) रा. अनखोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे मृतक तरुणाचे नाव आहे मृतक धीरजच्या वडिलांचा अनखोडा येथे पाणी कॅन वितरणाचा व्यवसाय आहे.त्याच्या व्यवसायात मुलगा धीरज मदत करत होता. रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास धीरज हा कूलिंग मशीन जवळ गेला असता कुलिंग मशीनच्या विद्युत तारेचा त्याला जोरदार झटका बसला व तो जागेवरच कोसळला. त्याला त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आष्टी येथेआणण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृत धीरज आपल्या आई-वडिलांना एकुलता एक असून त्याच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे त्याने यावर्षी दहावीची परीक्षा दिली असून त्याच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.या घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे