सामूहिक विवाह सोहळा म्हणजे समाजाचा मजबूत पाया-आ. संजय पुराम

Tue 08-Apr-2025,09:22 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-सामूहिक विवाह सोहळ्यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. ते सालेकसा तालुक्यातील ग्राम साकरीटोला येथील युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात बोलत होते. पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, साखरीटोला येथील युवा कुणबी समाज सेवा समिती सन 2003 पासून सतत सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत असून त्यांनी क्षेत्रात एका नव्या परंपरेला सुरूवात केली आहे. आज कित्येक संघटनांकडून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. मात्र या गौरवशाली परंपरेची सुरूवात साकरीटोला येथूनच झाली आहे. सामूहिक विवाह युगलांना सामाजीक बंधनात बांधण्याचे काम करीत असतानाच समाजही एकत्रीत होवून एका मंचावर येत असल्याचे मत ही व्यक्त केले. दि. 6 एप्रिल रविवार रोजी सकाळी 11.05 वाजता हिंदू विवाह पद्धतिने हजारो लोकांच्या उपस्थितीत नियोजित वेळी लग्न लागले. समितीने जेवण व पिण्याचा पाण्याची उत्तम व्यवस्था केले होते. विवाह सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री व आमदार डाँ. परिणय फुके, खा. डाँ. नामदेव किरसान, माजी खा. सुनील मेंढे यांच्या धर्मपत्नी शुभांगिनी मेंढे, डाँ. प्रमेश गायधने,व अन्य पाहुण्यांनी समाज बांधवाना मार्गदर्शन व नवविवाहित वर-वधूनां शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आ. सहेशराम कोरोटे,भेरसिंग नागपुरे, बाळा अंजनकर,जिप उपसभापती सुरेश हर्षे, माजी जि. प. सभापती सविता पुराम, जिप सदस्य उषा मेंढे, वंदना काळे, लक्ष्मी तरोने, माजी सभापती लता दोनोंडे, पस सदस्य संतोष बोहरे, पस सदस्य रेखा फुंडे, विजय बहेकार, काशीराम हुकरे, लक्ष्मण चुटे, सरपंच नरेश कावरे, चंद्रकुमार बहेकार, ठाणेदार भूषण बुराडे, कुणबी समाज सेवा समितीचे संस्थापक प्रभाकर दोनोंडे, भूमेश्वर मेंढे,कमलबापू बहेकार, रमेश चुटे, युगराम कोरे, संजय देशमुख, यांच्या उपस्थित विवाह सोहळा संपन्न झाला असून. विवाह सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष देवराम चुटे, अरविंद फुंडे, रामदास हत्तीमारे, प्रमोद कोरे, पुरूषोत्तम कोरे, योगेश बहेकार,प्रेम कोरे, प्रकाश दोनोडे,संजय दोनोंडे, जीडी भांडारकर,देवराज खोटेले, शामलाल दोनोंडे, अनिल काळे, पुरुषोत्तम कोरे, कैलास बहेकार, प्रेमलाल ठाकरे, मोहन दोनोंडे, नितीन शिवणकर, इंदूताई कोरे, मिताली काळे,टीना चुटे,किरण कोरे,स्वाती फुंडे,प्रतिभा मेंढे, मंजुषा दोनोंडे, सविता येटरे, निखिता कावरे, दीपलता हत्तीमारे, वैशाली मेंढे, सुषमा देशमुख,अरुणा मेंढे,व समितीचे पदाधिकारी व समाजबांधवानी मोठे परिश्रम घेतले आहे. यांतर्गत आतापर्यंत शेकडो जोडप्यांचा विवाह लावण्यात आले हे उल्लेखनीय आहे.