स्वतःला बदला,जग आपोआप बदलेल" गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांचे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
काळीमाती (ता. आमगाव) जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा काळीमाती शाळेत दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण अधिक मंगलमय झाले.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी, "यशस्वी होण्यासाठी आत्मनियंत्रण, एकाग्रता आणि सातत्य आवश्यक आहे. बाहेरील परिस्थिती एकाग्रतेत अडथळा आणते,मात्र प्रत्यक्षात आपल्या अंतर्गत मानसिक आणि शारीरिक मर्यादा अधिक जबाबदार असतात. त्या ओळखून बदलल्यास यश निश्चित मिळते. कामात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठता येते." असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत काळीमातीच्या सरपंच शीला पुरुषोत्तम चुटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. येटरे, गट समन्वयक सुनील बोपचे, वशिष्ठ खोब्रागडे,प्रतिभा कोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णकुमार मेहर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक जी. टी. रहांगडाले,केंद्रप्रमुख डी. एस. ढबाले, उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती योगिता मुनेश्वर, ग्रामपंचायत सदस्य होमेंद्र खोब्रागडे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सोमेश्वर कोरे,लखनलाल गिऱ्हेपुंजे,दिनेश फुंडे, किशोर गणवीर, वंदना पाथोडे,कविता फुंडे,घाटटेमनी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक व्ही. एस. गायधने सर, सेवानिवृत्त शिक्षक,धनराज गिऱ्हेपुंजे, सुरेश खोब्रागडे,जी. डी.भाकरे मॅडम यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक आनंद सरवदे, एन.जी.कांबळे,एम.एम.डोबनेऊके,एम.एम. हरीणखेडे,डी. के.मेंढे,के.जी.महादुले,दुर्गा मेहर,वैशाली उके यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमात सातवीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कु. खनक गिऱ्हेपुंजे व दक्ष मेहर यांनी केले, तर आभार अथर्व भांडारकर यांनी मानले.