भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या भव्य जयंतीचे आयोजन

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
आमगाव ( दि.१२ एप्रिल) प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 एप्रिल रोजी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पिंकेश शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.या दरम्यान दुपारी १:०० वाजता भव्य रैलीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आमगाव येथे करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दुपारी २:०० वाजता वैचारिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून वैभव दादा निखाडे युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार वर्धा, प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत लाखनी,प्रा.डॉ.ममता राऊत फुले-शाहु-आंबेडकरी विचारवंत भंडारा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सायंकाळी ६:०० वाजता 'गोल्डी ग्रुप' भंडारा यांचे भीम-बुद्ध गीताच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमाला सर्व धम्म- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पिंकेश शेंडे, उपाध्यक्ष विलास मेश्राम, जोत्सना शहारे, महासचिव इंजि. प्रशांत रावते, सहसचिव संजय डोंगरे, मेघा टेंभुर्णीकर, सहसचिव महेंद्र (अंतुले) मेश्राम, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे सर, व समितीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.