परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
आमगाव :- तालुक्यातील काळीमाती येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक कृष्णा खोब्रागडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा शीला पुरुषोत्तम चुटे उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष युवराज पटले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार मेहर, उपाध्यक्षा योगिता मुनेश्वर, ग्रामपंचायत सदस्य होमेंद्र खोब्रागडे,माया हेमराज गिऱ्हेपुंजे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सोमेश्वर कोरे, लखनलाल गिऱ्हेपुंजे, दिनेश फुंडे, किशोर गणवीर, सेवानिवृत्त शिक्षिका गीता भाकरे, शाळेचे मुख्याध्यापक जी टी रहांगडाले आणि अन्य सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक जी. टी. रहांगडाले यांनी प्रास्ताविकामध्ये डॉ. आंबेडकर यांचे बहुआयामी कार्य, शिक्षणातील योगदान, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची भूमिकेचे दर्शन घडवले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी "जय भीम" चे घोषवाक्य, देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर करून बाबासाहेबांना अभिवादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याचे व शिक्षणाच्या बळावर प्रगती साधण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक आनंद सरवदे, नीलकंठ कांबळे, मुकुंद डोबनेउके,मुकेश हरिणखेडे,देवेंद्र मेंढे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संयोजन व संचालन आनंद सरवदे व मुकुंद डोबनेउके यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकत्रितपणे "जय भीम" च्या गजरात बाबासाहेबांना वंदन करून केला