भारतीय स्टेट बँकेचे ए.टी.एम.फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सावनेर पोलीसांनी केली अटक

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
नागपुर:नागपुर ग्रामीण सावनेर येथे ८ घरफोडीचे गुन्हे उघड,एकुण १ लाख, ४५ हजार,२०० रूपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन सावनेर दिनांक ०७/०४/२०२५ रोजी पहाटे ०४:०० वाजता सावनेर पोलीस पेट्रोलींग करीत असतांना ते भारतीय स्टेट बँक शाखा डब्ल्युसिएल वाघोडा येथील ए.टी.एम. चेक करण्यास गेले असता एक इसम सदर ए.टी.एम फोडतांना दिसुन आला. पोलीसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता,अंधाराचा फायदा घेवुन तो आरोपी पळून गेला.त्यावेळी विभागिय गस्त अधिकारी मंगला मोकाशे सहा पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन सावनेर यांनी तात्काळ माहीती देवुन पोलीस स्टेशन चे सर्व स्टाफ बोलावुन घेतला. तात्काळ पोलीसांनी शहरात नाकाबंदी व पेट्रोलींग सुरू केली. पेट्रोलींग दरम्यान पोलीसांना आरोपी नामे संकेत ईश्वर गेडाम हा दादाजी नगर,सावनेर येथे मिळुन आला.पोलीसांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात दागिने व ए.टी.एम. फोडण्याकरीता वापरलेला लोखंडी रॉड मिळुन आला.पोलीसांनी त्याच्या ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता आरोपीने सावनेर शहरात घरफोडी केल्याचे सांगितले. तसेच तांत्रिक पुराव्या वरून ए.टी.एम. फोडणारा आणि घरफोडी करणारा आरोपी संकेत इश्वर गेडाम, वय-२७ वर्षे, रा.वार्ड क्र.०४ सावनेर हाच असल्याचे निष्पन्न झाले.पोलीसांनी नमुद आरोपीला सखोल विचारपुस करून दिनांक ०७/०४/२०२५ रोजी २१.०१ वाजता अटक करून आरोपीला मा. न्यायालयात समक्ष हजर करून आरोपीचा दिनांक ११/०४/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त केला. दरम्यान कालावधीत आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असतांना पोलीसांनी आरोपीची सखोल विचारपुस केली असता मागील एक वर्षा पासुन त्याने सावनेर शहर व डब्ल्युसीएल वाघोडा परीसरात एकुण ०८ घरफोडी केल्याची माहीती पोलीसांच्या हाती लागली. आरोपीच्या ताब्यातुन पोलीसांनी सोन्या चांदीचे दागिने आणि ए.टी.एम फोडण्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड असा एकुण किंमती १,४५,२००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.