शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांकडून अटक

Sat 12-Apr-2025,10:04 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

नागपुर:नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना काल (११ एप्रिल २०२५ ) रात्री उशिरा गडचिरोली येथील त्यांच्या निवासस्थानातून नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे.सदर अटकेचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी बोगस शालार्थ आयडी प्रकरणाशी यांचा संबंध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नागपूर पोलिसांनी गडचिरोली येथे गोपनीय कारवाई करत नरड यांच्या निवासस्थानी छापा टाकला रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत उल्हास नरड यांना ताब्यात घेण्यात आले. आणि त्यांना नागपुरात आणण्यात आल्याची समजते. ही कारवाई इतक्या गुप्तपणे पार पडली की स्थानिकांना याचा सुगावा लागला नाही पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत निवेदन जारी केलेले नसले तरी अटकेच्या कारणाबाबत तर्क वितर्क लडवले जात आहेत.शिक्षण खात्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरण गेल्या काही काळापासून चर्चेत आहे यापूर्वी या प्रकरणात वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती आता उल्हास मराठ्यांच्या अटकेमुळे हे प्रकरण अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे सूत्रांच्या मते बोगस कागदपत्राद्वारे मुख्याध्यापकांच्या पदाला मान्यता देण्याच्या आरोपांची नरड्यांचा संबंध असू शकतो मात्र याबाबत ठोस पुरावे आणि पोलिसांची अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.उल्हास नरड हे शिक्षण खात्यातील वरिष्ठ आणि प्रभावशाली अधिकारी असल्याचे मानले जातात त्यांच्या अटकेने नागपूर आणि गडचिरोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शिक्षक कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे काहींच्या मते ही अटक बोगस शालार्थ प्रकरणातील मोठ्या तपासाचा भाग असून येत्या काळात आणखी काही बडे अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असे बोलले जात आहे. सध्या नागपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत उल्हासनगर यांच्यावर नेमके कोणते आरोप ठेवण्यात आले आहेत आणि त्यांच्या हटके मागील खरे कारण काय आहे याबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे.या अटकेमुळे शिक्षण खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची अटक सामान्य बाब नसून यामागे मोठा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांच्या पुढील कारवाईवर आणि या प्रकरणातील खुलाशा यावर शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे लक्ष लागले आहे.