उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत एम.एम.पी. कंपनी धुरखेडा येथे झाला स्पोट स्फोटात नऊ कामगार जखमी

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
नागपुर:पोलीस स्टेशन उमरेड :- दिनांक ११/०४/२०२५ रोजी उमरेड पोलीसांना माहीती मिळाली की धुरखेडा येथील एम.एम.पी.या कंपनीमध्ये स्पोट झाला आहे.अशी माहीती प्राप्त होताच उमरेड पोलीस तात्कळ फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स यांना माहीती देवुन घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी नमुद कंपनीमध्ये स्पोटामुळे आग लागलेली होती.अग्निशमन दलाच्या मदतीने अगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. बुरखेडा येथील एम.एम. पी.कंपनी ही अॅल्युमिनीयम पावडर आणि अॅल्युमिनीयम फॉईल ची निर्मिती करणारी कंपनी असुन सदर कंपनीमध्ये झालेल्या स्पोटामध्ये काल संध्याकाळ पर्यंत कंपनी मधील ९ कामगार जखमी झाले असुन ३ कामगार बेपत्ता होते. आज दिनांक १२/०४/२०२५ रोजी ३ कामागांराचे मृतदेह मिळुन आले. ९ जखमीपैकी २ कामगांराचा मृत्यु झाला. जखमी कामगारांची नावे १. कमलेश सुरेश ठाकरे, रा. गोंडबोरी, २. पियुष बाबरावजी टेकाम, रा. पांजरेपार, ३. मनिष अमरनाथ वाथ, रा. पेंडराबोडी, ४. करण भास्कर बावने, रा पेंडराबोडी, ५. नवनित विठोबा कुमरे, रा पांजरेपार, ६. करण तुकाराम शेंडे रा. गोंडबोरी, ७. हरीदास नैताम वय ४५ वर्षे असे जखमी झाले असुन त्यांना मेडीकल कॉलेज नागपुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतकांची नावे १. निखील गंगाधर नेहारे , वय २४ वर्षे, २. निखील तुकाराम शेंडे, वय २५ वर्षे, ३. अभिलेख कमलाकर झंझाळ,वय २० वर्षे, ४. पियुष वासुदेव दुर्गे,वय २१ वर्षे,आणि ५.सचिन पुरूषोत्तम मसराम, वय २६ वर्षे यांचा मृत्यु झाला आहे.मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मेडीकल कॉलेज नागपुर येथे रवाना करण्यात आले आहे. कंपनीचे एच आर.मॅनेजर आशिष मेश्राम यांना विचारपुस केली असता सदर स्पोट दिनांक ११/०४/२०२५ रोजी संध्याकाळी ०६:४५ वाजताचे सुमारास झाल्याबाबत सांगितले. प्रथमदर्शी सदर स्पोट कंपनीमध्ये कोणीतरी हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे झालेला आहे असे दिसते त्यामुळे सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरुदध कलम २८७१२५ (बी) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयामध्ये आज रोजी कलम १०६(१) भा.न्या.सं (निष्काळजीपणामुळे मृत्युस कारणीभुत होणे) अन्वये कलम वाढ करण्यात आलेली आहे.सदर घटनास्थळी विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपुर हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा,रमेश धुमाळ,अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण,वृष्टी जैन उपविभागिय पोलीस अधिकारी,उमरेड तथा सहा पोलीस अधिक्षक पोलीस निरीक्षक चनाजी जळक,प्रभारी अधिकारी उमरेड ओमप्रकाश कोकाटे, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नागपुर ग्रामीण यांनी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच सहा. आयुक्त,कामगार,तहसीदार उमरेड, अग्निशमण विभागाचे अधिकारी,Directorate of Industrial Safety and Health (DISH) ने अधिक्कारी,यांनी सुध्दा भेट दिली आहे. (DISH) चे अधिकारी यांनी बारकाईने घटनास्थळाचे निरीक्षण केले असुन सदर प्रकरणात चौकशी करून नमुद कंपनी किंवा संबधित अधिकारी यांच्या कडुन कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले किंवा कसे या बाबत चौकशी अहवाल देणार आहे. त्या चौकशी अहवालाच्या अधारे सदर गुन्हयात आरोपी निष्पन्न करून सदर गुन्हयात संबधितांना आरोपी करून त्यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.