चंद्रपुरात गुप्त धन शोधणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात गुप्त धन शोधणारी टोळीना वार्डातील लोकांनी पकडुन पोलिसांचे स्वाधीन केले. त्यात १ महिला सहित ४ पुरुषांना पकडले तर १ महिला सहित ३ पुरुष डाव साधून पळून गेले. सदर घटना १० एप्रिल रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास श्यामनगर चंद्रपूर येथील परिवर्तन चौक, नाग मंदिर जवळील खुल्या पटांगणात घडली.१० एप्रिल रोजी डायल ११२ वर कॉल आला की काही लोक श्यामनगर येथील परिवर्तन चौक, नाग मंदिर जवळील खुल्या पटांगणात खोदकाम करीत आहे. त्यावरून रामनगर पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी रवाना झाले. तिथे वार्डातील लोकांनी आरोपी रोहीत गोपीचंद शर्मा (४७) रा.७१ गल्ली न. ३ सुखराम कॉलनी पटीयाला राज्य पंजाब ह. मु. वॉर्ड न २ गणेश दादा उराडे यांचे घरी किरायाने गोंडपिपरी जि. चंद्रपूर,रवि लहानु सिडाम (५३) रा. भद्रनाग वॉर्ड, डॉ. आंबेडकर कॉन्व्हेट जवळ भद्रावती जि. चंद्रपूर, रविकीरण अनाजी इंगोले (४८) रा. थोराना ता.भद्रावती जि. चंद्रपूर, सोनु सदाशिव मांढवगडे (३०) रा. विठ्ठलवाडा ता. गोंडपिपरी जि. चंद्रपुर,सपना भगवान कोसरे (२४) रा. ताडपल्ली ता.शिरपुर जि. आदीलाबाद राज्य तेलंगना यांना पकडुन ठेवले होते.त्यांची पोलीसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने सांगितले की त्यांना फरार आरोपी सविता रॉय राशन दुकान वाली हीने सदर ठिकाणी बोलावुन पुजा करण्यासाठी कुवारी मुलगी व मुलगा व खोदकाम करण्यासाठी येथे बोलाविले होते तिथे गुप्त धन जादुटोना करून गुप्त धन सोने काढुन त्यातील काही हिसा आम्हा सर्वांना वाटुन देणार होती आमचे सोबत पळून गेलेले इसमाचे नावे नशा बार वाला त्याचा मोबाईल नंबर क्रमांक ९२२६२१०५९८ चा धारक व इतर दोन अनोळखी ईसम या सर्व आरोपीवर पोलीसांनी महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उचाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ मधिल अनुसुची मधिल ४ नंबरचा अपराध होत असल्याने आरोपी विरुध्द कलम ३ (२) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसिफराजा शेख करीत आहे.