उपसरपंच पुतण्याने केली काकाची हत्या अनैतिक संबंधातून झाली घटना

प्रतिनिधी शैलेश अकर्ते पुसला
वरूड:वरूड तालुक्यात जामठी येथील उपसरपंच असलेल्या पुतण्याने त्याच्या काकाची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. हे हत्याकांड अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे.रामकिशोर परिहार, वय ४२ वर्षे, रा. जामठी असे हत्या झालेल्या काकाचे नाव आहे. कपिल परिहार असे काकाची हत्या करणाऱ्या उपसरपंच पुतण्याचे नाव आहे.उपसरपंच कपिल परिहार यांनी रामकिशोर यांची धारधार शस्त्राने हत्या करून त्यांचा मृतदेह विहिरीत टाकला. या प्रकरणी मृतकाचे बंधू बालकिसन हरिभाऊ परिहार यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल परिहार व रामकिशोर यांची पत्नी पुष्पा यांचे अनैतिक संबंध असल्याचे व त्यातूनच हा खून झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी जामठीचा उपसरपंच कपिल परिहार (३०) याला ताब्यात घेत विचारपूस केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.यावेळी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर, वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, शे. घाटचे ठाणेदार दीपक महाडिक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.