जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंन्द्रपुर व ऊर्जानगर ग्राम कार्यालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन

Thu 17-Apr-2025,08:51 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर: उर्जानगर ग्राम पंचायत,चंन्द्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.16/4/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी एस भिष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश ( वरीष्ठ स्तर) सुमीत जोशी सरांनी विधी सेवा प्राधीकरणाच्या विविध योजना व विधी सहायता बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. धनंजय तावाडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन ॲड.देवा पाचभाई यांनी केले .यावेळी मंचावर ॲड महेंद्र असरेट,सरपंच येरगुडे मॅडम प्रामुख्याने ऊपस्थीत होते.