काटोल नगरपरिषद अंतर्गत कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्रा मध्ये एमपीएससी च्या विद्यार्थ्यां करिता सराव परीक्षेचे आयोजन

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
काटोल:नगरपरिषद काटोल अंतर्गत कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्र मधील एमपीएससी च्या विद्यार्थ्यां करिता सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नगरपरिषद काटोल धनंजय बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व ग्रामीण विद्यार्थी हा शहराच्या तुलनेत कुठेही मागे पडू नये म्हणून या सराव परीक्षेचे आयोजन केंद्रामध्ये करण्यात आलेले आहे.यासोबतच पुढील काळात बँकिंग,पोलीस भरती तथा इतरही सराव परीक्षा प्रत्येक रविवारला.घेण्यात येणार असल्याचे ग्रंथपाल राजेंद्र राऊत यांनी आपला मानस व्यक्त केलेला आहे.यावेळी ग्रंथपाल राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० विद्यार्थ्यांनी एमपीएससी सराव परीक्षेत भाग घेतला होता.माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पुढाकारातून हे कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्र स्थापन करण्यात आलेले असून या ठिकाणी 466 विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थी इथे रोज अभ्यास करीत आहे आणि ग्रंथालयाचे फलित म्हणून गेल्या दोन वर्षांमध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय नोकरीत तथा निमशासकीय कार्यालयामध्ये उच्चस्तरीय पदावर निवड होऊन कर्तव्य बजावत आहे पुढील काळात या अभ्यासिकेतून अनेक अभ्यासक उच्च पदावर कार्य करतील व काटोल व य याभागचे नावलवकिक करतील .हा विश्वास अभ्यासक व ग्रंथपाल यांचा आहे.