सर सी.व्ही.रमण भारताचे खरे वैज्ञानिक-डॉ मूर्ती

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय येथे दि 28 फेब्रुवारी 2025 रोजी महान वैज्ञानिक डॉ.सी. व्ही.रमण यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.मूर्ती तर प्रमुख अतिथी पदी डॉ.मच्छिंद्र नंदेश्वर,डॉ.पूनम ठाकुर हे उपस्थित होते. या दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयामध्ये काही प्राध्यापकांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले, तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयातील स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांची परिसंवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पावरपॉइंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयातील संशोधनाबद्दल माहितीचा उहापोह करून उपस्थित विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धींगत केले.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. भूपेश मेंढे व प्रा.अविनाश डोंगापुरे सूत्रसंचालन प्रा.साक्षी ब्रह्मवंशी व आभार प्रदर्शन यांनी प्रा.गौरी आडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.