लक्ष्मी कोडापे गोंडवानाच्या मिनी गोल्फ संघाचे करणार नेतृत्व मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी लक्ष्मी कोडापेने मानाचा तुरा

Tue 15-Apr-2025,08:46 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

आरमोरी :- दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची खेळाडू लक्ष्मी कोडापे या विद्यार्थिनीची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेकरिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघात निवड करण्यात आलीआहे.लक्ष्मी कोडापे गोंडवाना च्या मिनी गोल्फ चमुचे नेतृत्व करणार आहे.श्री.जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठ,चुडेला झुंझुनू, राजस्थान येथे २४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेच्या च्या स्ट्रोक इव्हेंट मध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.यापूर्वीही या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी राज्यव देशातील विविध विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन केलेले आहे.मिनी गोल्फ स्पर्धेकरिता महाविद्यालयातील लक्ष्मी कोडापे विद्यार्थीनीची निवड झाल्याबद्दल दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. दशरथ आदे, प्रशिक्षक प्रा. हरीश बावनथडे, महाविद्यालयाचे हितचिंतक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.