शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश

अब्दुल करीद बख्श हिंगणघाट
वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ,ना.पंकज भोयर पालकमंत्री वर्धा, आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली आमदार समीर कुणावार यांनी दिनांक २८/०१/२५ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना पत्र व्दारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट बाबत आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेत आज दिनांक १९/०३/२०२५ बुधवार रोजी मा. वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबांच्या दालनात दुपारी ४.३० वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री पंकज भोयर,आमदार कुणावार, प्रधान सचिव उच्च तंत्र शिक्षण विभाग धीरजकुमार,आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन नागपूर राजू निवतकर,चंदनवाले संचालक वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई,आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, जिल्हाधिकारी वर्धा, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, उपसचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट व संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये आमदार समीर कुणावार यांनी प्रामुख्याने वैद्यकीय महाविद्यालय बांधकाम, तसेच जागा हस्तांतरण या मुख्य विषयांवर चर्चा केली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी जागा हस्तांतरण बाबत कृषी विभागाकडून फाईल प्राप्त झाली असून येत्या काही दिवसांत जागेचे हस्तांतरण होईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे त्याच प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथील कामकाज सुरळीत होण्यासाठी याठिकाणी नियमित प्रशासकीय अधिका-यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची बाब बैठकीत उपस्थित करताच यावर सुध्दा सकारात्मक प्रतिसाद देत नियमित प्रशासकीय अधिका-यांची नियुक्ती करण्याचा सुचना तसेच बँकेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट चे खाते तातडीने उघडण्यात यावे असे निर्देश संबंधिताना दिले आहे तसेच महविद्यालया निर्मिती करीता डि.पि.आर. तयार करण्याच्या सूचना सुध्दा यावेळी दिल्या असून या वैद्यकीय महाविद्यालयाकरीता निधीची कमतरता पडू देणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्याच प्रमाणे सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सुचना यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री यांनी दिल्या आहेत तसेच आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैद्यकीय महाविद्यालय समवेत कॅन्सर रूग्णालयांची मान्यता देण्याबाबत विनंती केली होती त्यांच्या मागणीची दखल घेत या महाविद्यालय समवेत आता कॅन्सरवर उपचार करण्यासाठी म्हणून नविन कॅन्सर रुग्ण विभाग सुरू करण्याचे मान्य केले आहे त्याप्रमाणे बीएससी नर्सिंग कॉलेज हिंगणघाट होण्याबाबत चे पत्र दिले असून त्यांनी तात्काळ त्यापत्रावर शेरा लिहून प्रधान सचिव धिरजकुमार यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अन्य मुख्य विषयांवर सुध्दा सकारात्मक चर्चा झाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट चे काम गतीमान पध्दतीने करण्यात याव्या अश्या सुचना त्यांनी संबंधीतांना दिल्या असून दर तीन महिन्यांनी महाविद्यालय संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे एकंदर आजच्या बैठकीचे यशस्वी आयोजन करत वैद्यकीय महाविद्यालय प्रश्न निकाली निघाला असून महाविद्यालय निर्मितीचा पुढील मार्ग सुकर झाल्याचे दिसून येते आहे