जिल्हा परिषद हायस्कूलच्या स्वछतागृहाचे लोकार्पण

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर - जिल्हा परिषद स्वच्छता अभियान अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये मुलामुलींसाठी स्वच्छतागृह बांधकाम करण्यात आले. या स्वच्छतागृहाचे लोकार्पण जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नुतन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान नुतन सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.शाळेतील अडचणी जाणून घेतल्या.यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धनंजय साळवे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य राम टोंगे,मुख्याध्यापक दिनेश वरघणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील चौधरी, सदस्य विद्या पाझारे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, प्रदीप गेडाम, सुनील रोंगे, ग्राम अधिकारी किशोर धकाते यांची उपस्थिती होती.उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत यांनी स्वच्छतागृहाचे लोकार्पण केल्यानंतर शाळा परिसराचे अवलोकन केले. दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने आदरातिथ्य केले. मान्यवरांसोबत सेल्फीचा आनंद घेत आमची शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल म्हणून शाळेप्रती आस्था व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहाय्यक शिक्षक शैलेश बरडे, संजय उईके, अजय ठाकरे,प्राजंली करडभूजे, खान मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.