लोहारा येथील सिमेंट नाल्याची अवस्था खराब गेल्या पाच सहा वर्षापासून नाल्यांची साफसफाईच नाही

Sat 29-Mar-2025,08:37 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-महाराष्ट्र शास एकीकडे आरोग्य संदर्भात विविध उपक्रम रॅली व साफसफाई चे धडे माझे गाव माझी जबाबदारी व स्वच्छ सुंदर परिसर ही परंपरा गेल्या दहा ते अकरा वाजता पासून देशाचे प्रधानमंत्री वाजा गाजा करतात तर दुसरीकडे शासनाचेच लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत स्तरावर लाखो रुपये खर्च होतात अनेक कामाकरिता पैसा मंजूर होतो परंतु तो पैसा कुठे मुरतो हेच अजून पर्यंत ही नागरिकांना कळले नाही बरेच काम कागदावर दाखवून पैशाची उधळपट्टी मलमपट्टी करत असतात. सालेकसा तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायत असून दोन ते तीन गावे समावेश आहे. यामध्ये लभानढारणी केहरीटोला, मसीटोला, व लोहारा फक्त भिंतीवर ग्रामपंचायतींनी स्वच्छ गाव स्वच्छ परिसर असे लिहिले परंतु प्रत्यक्षात प्रत्येक वार्डात प्रत्येक गल्लीत नालीमध्ये घाण कचरा व पाणी साचून आहे.त्यामुळे मच्छर यांच् प्रकोप वाढलेला असून याच् दुष्परिणाम शाळेकरी विद्यार्थी व इतर नागरिकांवर धोका होऊ शकतो.लोहारा हद्दीमध्ये व गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून आरोग्य केंद्राच्या बाजूला सुद्धा नालीत. तुडुंब भरलेली असून ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा ही नाली सुद्धा कचऱ्याने भरलेली आहे या गावी हायस्कूल असून मोठ्या व साथीच्या व यजा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या गावी भाजपची सत्ता असताना सुद्धा विकास थांबलेला आहे 14 वा 15 वित्त आयोगाच्या निधी जातो कुठे हे सुद्धा अजूनही कळले नाही.केहरीटोला जिल्हा परिषदेच्या जवळील नाली सुद्धा बुजलेली आहे, नालीवर लाकडे रेती गिट्टी कचरा असून मच्छरांच् प्रकोप वाढलेला आहे.अनेक बोरवेल बंद असून पिण्याच्या पाण्याची सध्या समस्या सुरू आहे.लोहारा ग्रामपंचायत चे अधिकारी हे मुख्यालय राहत नाही व त्यांचे गावाकडे लक्ष नसत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोहारा ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

1.प्रतिक्रिया

प्राप्त माहितीनुसार सालेकसा पंचायत समिती सभापती यांचे लोहारा हे कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून गाव आहे परंतु त्यांच् एक महिन्यापूर्वी सहयोग हॉस्पिटल गोंदिया समोर अपघात झाल्यामुळे ते सध्या गोंदिया वरून येणे जाणे करीत आहेत व जर ग्रामसेवक वेळेवर जनसामान्य माणसाचे काम करीत नसतील तर ते मला बघावे लागेल.

विना कटरे सभापती पंचायत समिती सालेकसा

 

2.प्रतिक्रिया

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता सध्या माझ्याकडे तक्रार आली नाही तरीसुद्धा मी आपल्या स्तरावरून चौकशी करून जर नाल्याची व इतर सोयीसुविधा व पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असेल तर यावर उपाययोजना करू जर ग्रामसेवक लक्ष देत नसेल तर नक्कीच नियमानुसार कारवाई केली जाईल.

संजय पुरी गटविकास अधिकारी पंचायत समिती सालेकसा