महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष प्रशंसा मनोज अंबेरे यांचा वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Fri 28-Mar-2025,07:34 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर

अकोला:अकोला छत्रपती शिवाजी नगर जुने शहर या भागात भाजी बाजार भरतो या बाजारात काही ना काही कारणावरून नेहमी वादविवाद चालू असतात या ठिकाणी कोणतीही अनुचित बाब घडू नये व काही समाजकंटकाच्या माध्यमातूनही कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून या परिसरातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावे.या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुध्दा आहे.सी.सी.टिव्ही न बसविल्यास या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याचे सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार.या ठिकाणावरून दररोज अवैध जड वाहनाची सुध्दा ये-जा चालु असते.त्यामुळे वाहतूकीची तुंबळ निर्माण होते.यामुळेच तेथील स्थानिक नागरिकांना सुध्दा त्रास सहन करावा लागतो.सदर भागात लहान मुलांची शाळा सुध्दा आहे.या जड वाहतूकीचा लहान मुलांना व पालकांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.या जड वाहतूकीमुळे गर्दी होत असल्यामुळे त्याचा फायदा भुरटे चोर घेत आहे.या अवैध जड वाहतुकी मुळे एखादी जिवित हानी सुध्दा होऊ शकते.ह्या दोन्ही गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाय योजना करावी ही विनंती यावेळी अंबेरे यांनी केली.जिल्हाधिकारी यांनी लवकरच सी.सी.टिव्ही बसवण्यात येणार व जड वाहतूक बंद करण्यात येणार असे आश्वासन दिले.यावेळी रूपाली गमे शहर उपाध्यक्ष,संगीता चोपडे विभाग अध्यक्ष,सारिका नरडे शाखाध्यक्ष,प्रिया ठाकूर सर्कल अध्यक्ष,अनिता डिगेकर शाखा उपाध्यक्ष,संगिता मेहसरे सर्कल अध्यक्ष आदी महीला उपस्थित होत्या.