अखेर रास्तारोको आंदोलनाच्या धसक्याने पळसगाव जोगीसाखरा रस्तेवरील नाल्याच्या अपुरे पुलियाच्या बांधकामास सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात नागरीकांच्या प्रयत्नाला यश
आरमोरी -पुलियाचे अपुरे काम तात्काळ सुरू करा अन्यथा दि 25 मार्चला रास्तारोको आंदोलन करण्यात येईल या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात परीसरातील नागरीकाचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा.दिला होता यांची प्रशासनात खळबळ माजुन आज दिनांक २४ मार्चला उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी यांनी लवकरच अपुरे पुलियाचे बांधकाम सुरू करण्याचे लेखी हमी पत्र लिहून देल्याने पळसगाव जोगीसाखरा रस्तेवरील अपुरे पुलियावर होणारे दिनांक २५ मार्चचे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असता आज दिनांक २७ मार्चला सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यावरील अपूर्ण पुलियाच्या बांधकामास सुरुवात केल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वातील नागरीकांच्या प्रयत्नाला यश आले आहे.आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा ते पळसगाव ते डोंगरगाव रस्तेवरील दोन पुलिये बांधकाम करण्यात आले परंतु पुलिया रस्ते पेक्षा बाराते तेरा फुट उंच करून अजून पर्यंत उतारा तर काढला नाही पुलियाचे चे काम सुध्दा अपुरा असल्यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी झाल्यामुळे बरेच दिवसांपासून देसाईगंज वरुण शंकरपुर मार्गाने येत असलेली एसटी महामंडळाची बस जोगीसाखरा पळसगाव नाल्यावरील फुलीया बांधकाम अर्धवट असल्याने बस बंद झाल्याने शाळकरी मुल व नागरीकांना अडचण निर्माण झाली तसेच पुलिया बरोबर नाल्याला साईड वाल करणे गरजेचे होते परंतु ठेकेदार यांनी साईड वाल न केल्याने तसेच समोर गचकित मुरुम किंवा गिटी न टाकल्याने आज सकाळी पळसगाव येथील वाहनाला साईडला जागाच जाण्यासाठी मिळाली नसल्यामुळे बाटलीवर चालणारी गाडीच नाल्यात जाताजाता बचाविल्याने मोठा अपघात टळला या पुविही अनेक अपघात या ठिकाणी झाले यांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले परंतु आता काम सुरू होणार आहेच असे उतर मिळाले आहेत परंतु आज झालेल्या घटनेच्या निषेधार्थ नागरीकानी प्रशासना विरोधात रोष व्यक्त करुन जोगीसाखरा पळसगाव व पळसगाव डोंगरगाव नाल्या वरील अध्यवट पुलीयाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा दिनांक 25 मार्चला पळसगाव जोगीसाखरा नाल्यावरील अर्धवट पुलियावर रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात परीसरातील नागरीकानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला होता यांची प्रशासनात खळबळ माजुन आज दिनांक २४ मार्चला उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी व रामदेव कंस्ट्रक्शन कंपनी शेंदूरवापा यांनी लवकरच अपुरे नाल्यावरील पुलियाचे बांधकाम सुरू करण्याचे लेखी हमी पत्र लिहून देल्याने आरमोरी तालुक्यातील राज्यमार्ग पळसगाव जोगीसाखरा डांबरीकरण रस्तेवरील अपुरे नाल्यावरील पुलियावर दिनांक २५ मार्च ला सकाळी ११ वाजता होणारे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असता आज दिनांक २७ मार्चला आरमोरी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यावरील अपूर्ण पुलियाच्या बांधकामास सुरुवात केल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वातील नागरीकांच्या प्रयत्नाला यश आले आहे यावेळी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेडमेक ,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम,कार्तिक मातेरे ,भेनेश्वर अंबादे,तुषार गोधोळे,दिलीप मने,महेश भोयर,दिवाकर जांभुळे,नरेश बरडे,रघुनाथ नखाते ,संदिप सपाटे,गौरीशंकर हजारे,प्रणय सहारे,बळीराम कांबळे,नारायण उरकुडे,रमेश ऊरकुडे,दिनकर मने,कैलास लिंगायत,राहुल घोडाम,सुमित ढोरे आदी उपस्थित होते.