दिव्य अखंड ज्योत कलश यात्रेचे आरमोरीत स्वागत

Sat 29-Mar-2025,07:40 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली:आरमोरी तालुक्यात गुढीपाडव्याच्या पुर्व संध्येला 29 मार्च रोजी येथील दत्त मंदिर देवस्थानात कलश यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.येथील तहसीलदार उषा चौधरी मॅडम यांनी कलश पुजन करून भाविक जनतेच्या सुख समृध्दीसाठी प्रार्थना केली.तत्पूर्वी दत्त मंदिर देवस्थान तथा माजी जि प सदस्या लक्ष्मी मने,यांनी कलश पुजन केले.याप्रसंगी योगगुरु सत्यनारायन चकीनारपुवार, सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय खरवडे,दिपक बेहरे,महेंद्र शेन्डे,भुवनेश्वर सेलोकर ,जेष्ठ पत्रकार विलास गोंदोळे,राहुल तिमीरमारे, देविदास चटुले,नाना चोपकार,प्रमोद सेलोकर,बंडु डोकरे,वामन शेन्डे,अरविंद मने,रमेश गोंदोळे,भाऊराव हेमके तसेच इतर प्रतिष्ठित व्यवसायिक ,मान्यवर व गायत्री परिवारातील साधकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.