पालोरा येथे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण व गोंडी धर्म संमेलन

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी- नगरपरिषद क्षेत्रामध्ये येणाऱ्या पालोरा येथे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके जंगोम सेना यांच्या वतीने आज दिनांक 23 मार्च रोज रविवारला दुपारी १२ वाजता गोटून भूमी पालोरा येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तथा गोंडी धर्म संमेलन आयोजित करण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव कीरसान तर अध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम राहणार आहे विशेष अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, आरमोरी तालुका शाखा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.निलकट मसराम, शिक्षण महर्षी भाग्यवानजी खोब्रागडे माजी आमदार आनंदराव गेडाम माजी आमदार रामकृष्ण मडावी प्रा.दौलत धुवै वनपरिक्षेत्राधिकारी भूषण खंडाते तहसीलदार चौधरी मॅडम डॉक्टर छाया ऊईके पोलीस निरीक्षक कैलास गवते मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्वप्रथम गावातुन गोंडी कोया पुनेम रैली ध्वजारोहण व पुतळ्याचे अनावरण गोंडी धर्म संमेलन व मागदर्शन होणारं आहे.तरी या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जंगोम सेनेचे अध्यक्ष चंदु मडावी अमोल टेकाम दिपक मडावी यशवंत कोडापे विलास गेडाम छबिल हलामी यांनी केले आहे.