गोमजी सोमजी ज्वालादेवी देवस्थानाला दिली शेंडे परिवारांनी भेट

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-मध्यप्रदेश राज्यातिल बालाघाट जिल्ह्यातील विकास समिती ग्रामपंचायत पायली रावडबंदी भरवेली हे एक गाव असून एकमेव नाव लौकिक व सुप्रसिद्ध ट्रस्ट समिती म्हणून नावास्वरूप आलेले आहे व येथे देशातून हजारो राज्यातील भाविक जनता जनार्दन नेहमी होडी मिलनच्या पाचव्या दिवसापासून तर पोर्णिमेपर्यंत नेहमीच गर्दी पहावयास मिळते पुरातन काळापासून रूढीपरंपरेनुसार दिनांक 20 मार्च 2025 ला महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई अंतर्गत उपराजधानी नागपूर उपराजधानी पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी येथील नेहमीच गोमजी सोमजी हे दोन पुरातन काळातले पंजोबा उगमस्थान झालेले एक परिवाराला दिशा देणारे घराणेशाही असलेले गोमजी सोमजी यांनी बालाघाट जिल्ह्यातील भरवेली या ठिकाणी एका उंच टेकडी पहाडीवर आपली एक प्रमाणे ओळख निर्माण करून शेंडे परिवारांचे आराध्य दैवत म्हणून त्यांना एक पूजनीय मान मिळालेले आहे.येथे सर्व देशातील वेगवेगळ्या राज्यातून नेहमीच गोमजी सोमजी या देवस्थान ट्रस्टला शेंडे परिवार येऊन एकत्र स्नेहभोजन व आपले कुलदेवता समजून या ठिकाणी नेहमी येत असतात यासाठी सर्वप्रथम बोदलबोडी येथील शेंडे परिवार नेहमीच भेट देत असतात यामध्ये ज्या गावात शेंडे परिवाराची संख्या आहे. त्या गावातूनही अधिक लोक नेहमी या ट्रस्टला भेटी देत आहेत. यामध्ये बोदलबोडी,गिरोला, दरेकसा,सिंगाटोला,कोटर,भजेपार,सोनारटोला गांधीटोला सालेकसा हलबीटोला,आमगाँव तालुक्यातील माली,शंभूटोला, कालीमाटी,जवरी,किडंगीपार,आमगाँव,किकरीपार,गोरठा तर गोंदिया तालुक्यातील तांडा, अदासी,गोंदिया,कामठा, दवनीवाडा तर छत्तीसगड राज्यातील रायपूर,भिलाई पावर हाऊस,दुर्ग, डोंगरगड, राजनांदगाव,यांच्यासह इतर राज्यातील शेंडे परिवार गोमजी सोमजीच्या भेटीला नेहमी येत असतात व होळी मिलन सार म्हणून एक भेटीगाठी सुद्धा होत असतात व पूजा अर्चना सुद्धा केली जाते ज्वालामुखी दरम्यान भेटीदरम्यान बोद्लबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव शेंडे,जेठीराम शेंडे,मोहनलाल शेंडे,चुनीलाल शेंडे,खुशाल शेंडे,उमेश शेंडे,नितेश शेंडे,राजू शेंडे,धनराज शेंडे यांच्यासह महिला मंडळ पुरुषवर्ग युवा वर्ग मोठ्या संख्येने बाहेरून आलेले शेंडे परिवार उपस्थित होते.विशेष म्हणजे बालाघाट जिल्ह्यातील विकास समिती ग्रामपंचायत पायली रावडबंदी भरवेली येथील एक जंगलव्याप्त व शहरी भागात असलेल्या खडक पहाड व जंगलाने व्यापलेले घनदाट अवस्थेत असलेली गोमजी सोमजी नावाने एक ट्रस्ट आहे परंतु आजही स्वातंत्र्याच्या 75 ते 76 वर्षानंतर येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही व भक्तनिवास नाही महिला व पुरुषांकरिता शौचालय बाथरूमची पर्याय व्यवस्था नाही तसेच गुफेपर्यंत वर जाण्याकरिता पायऱ्यांची व्यवस्था नसल्यामुळे येथील वयोवृद्ध व्यक्तींना सुद्धा फार मोठा त्रास सहन करावा लागत असते भक्तनिवास नाही. पार्किंगची पर्याय व्यवस्था नाही,पावसाळ्यात सुद्धा फार मोठा याच्या त्रास इतर दर्शनाकरिता येजा करणाऱ्यांना सुद्धा फार मोठी तारेवरची कसरत करावी लागत असते पायऱ्याची व्यवस्था अर्धवट करण्यात आलेली आहे त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असते सदर येथील स्थानिक विधायक, लोकप्रतिनिधी,जनपद पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व ट्रस्टच्या समितीच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावा ही शेंडे परिवार व गोमजी सोमजी ट्रस्ट समितीच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे