आरमोरी येथील श्रीराम भक्त ज्योत आणण्यासाठी अयोध्येला झाले रवाना

Wed 26-Mar-2025,09:44 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी-दिनांक ०१ एप्रिलला मराठी नववर्ष गुडीपाडवा व दिनांक ०६ एप्रिलला श्रीराम नवमी असल्याने आरमोरी येथील जवळपास ५० रामभक्त प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या येथील रामंदिरातून ज्योत आणण्यासाठी रवाना झाले आहेत.आरमोरी येथील स्थानिक राममंदिरात दरवर्षी रामजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.त्याचप्रमाणे ०१ एप्रिलपासून ते ०६ एप्रिलपर्यंत राममंदिरात रामचरित्रमानस व भागवत प्रवाचनाचा कार्यक्रम असतो. त्याप्रीत्यर्थ मागिलवर्षीप्रमाणे याहीवर्षी आरमोरी शहरातील रामभक्त ज्योत आणण्यासाठी अयोध्या येथे रवाना झाले असून अयोध्येतील श्रीरामाच्या ज्योतीचे आगमन दिनांक ३० मार्चला सकाळी ८.०० वाजता आरमोरी येथे होणार आहे.तसेच या ज्योतीची भव्य रॅली आरमोरी शहरात ढोल,ताशा,दिंडीच्या गजरात निघणार असून कलश यात्रा सुद्धा भाविकांना पाहायला मिळणार आहे.तरी जास्तीत जास्त भाविकांनी या ज्योतीचे दर्श घ्यावे असे आवाहन राममंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.सदर ज्योत आणण्यासाठी सागर मने,भूषण सातव,नितीन जोध,रवी खोब्रागडे,उल्हास मने,सुनील खोब्रागडे,अश्विन तितिरमारे,सुधीर सपाटे,मंगेश चन्ने,आशिष दहिकार,विलास हटवार, संतोष मोटघरे,अशोक समरीत,रामेश्वर भांडेकर,पारस सेलोकर,राजू उपासे,मिथुन शेबे,गौरव दहिकार,अशोक भोयर,वामन खापरे,गजानन दुमाणे,पप्पू धोटे,राकेश कामथे,मोहनिश चापले, आशीर्वाद आत्राम,सचिन गायकवाड,शंकर गुरनुले,सुनील चन्ने,सचिन मगरे, साहिल हेमके, आदी आरमोरी शहरातील रामभक्त अयोध्या येथे रवाना झाले आहेत.