आमदार राजू नवघरे यांचा दणदणीत विजय
प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली
वसमत : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजू नवघरे यांनी 29 हजार 432 मतांची आघाडी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला.
वसमत विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. 3लाख 765 पैकी 2लाख 40 हजार 737 मतदातांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून परभणी मार्गांवरील आयटी आय येथे मतमोजणी सुरुवात झाली होती. मतमोजणी च्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार राजु नवघरे यांनी 5हजार मतांची आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरी पर्यंत मतांची आघाडी त्यांच्या कडे होती. वसमत शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांना जवळ पास 7 हजार मतांची मोठी आघाडी मिळाली त्यानंतर त्यांना मताधिक्य मिळवता आले नाही.महायुतीचे उमेदवार राजू नवघरे योग्य नियोजन व कार्यकर्त्यांची शेवट च्या टप्यात बांधणी केली. त्यामुळे तर त्यांना विजय गाठता आला. आ. राजू नवघरे यांचे गुरु जयप्रकाश दांडेगावकर यांचा त्यांनी पराभव करत अखेर त्यांना चितपत केले. 15 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून महायुती व महाविकास आघाडीचे प्रचारात वेग चार नोव्हेंबर रोजी अनेकांनी अर्ज मागे घेतल्यानंतर वसमत मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर,राजू नवघरे,गुरु पादेश्वर महाराज तिरंगी लढत होती परंतु ज्यावेळी प्रचार संपला. त्यानंतर मात्र दांडेगावकर व नवघरे यांच्यापैकी एक उमेदवार विजयी उमेदवार विजयी होईल अशी शक्यता वर्तविल्ली जात होती.
आतापर्यंत आ. नवघरे यांनी मतदारसंघात सिंचन,रस्ता, गाव पातळीवरील कामे, तसेच नेत्र शस्त्रक्रिया, गरजूंना मदत,हक्के वर हजर होणे यासह आदि कामे केली आहेत. या कामाचे फलित विधानसभेत सलग दुसऱ्या विजयातून आ. नवघरे यांना मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मतदारांतून सुरू आहे .