अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे आरोपी भिवापूर पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
नागपुर:भिवापूर पोलीस स्टेशन भिवापुर दिनांक २८/०३/२०२५ रोजी भिवापुर पोलीस,अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती प्राप्त झाली की, अवैधरित्या रेतीची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा तास येथे नाकाबंदी करून खालील प्रमाणे कारवाई केली.१). नाकाबंदी दरम्यान १२ चक्का ट्रक वाहन क्र एम.एच ४९ सी.एफ ९३५७ हे मिळुन आले. पोलीसांनी सदर वाहन थांबवुन त्याची तपासणी केली असता टिप्पर मध्ये ८ ब्रस रेती मिळुन आली. वाहन चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असता मंगेश रवी पवारे, वय २३ वर्षे, रा निलज, ता. पवनी, जि.भंडारा अशी माहीती प्राप्त झाली. त्याला वाहन मालकाबाबत विचारपुस केली असता मुरलीधर कड्डु, रा. नागपुर असे नाव समजले.२). नाकाबंदी दरम्यान १२ चक्का ट्रक वाहन क्र एम.एच ४० सीडी ४८२४ हे मिळुन आले पोलीसांनी सदर वाहन थांबवुन त्याची तपासणी केली असता टिप्पर मध्ये ८ ब्रास रेती मिळून आली. वाहन चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असता सचिन भाउराव लांडगे, वय ३४ वर्षे, रा. दिपाळा, ता. कुही जि. नागपूर अशी माहीती प्राप्त झाली. त्याला वाहन मालकाबाबत विचारपुस केली असता किरण विश्वेश्वर इंगोले, वय ३५ वर्षे, रा. नवरगाव, ता. कुही, जि. नागपुर असे नाव समजले.३). नाकाबंदी दरम्यान १२ चक्का ट्रक वाहन क्र एम. एच. ४० बी.एल ५६४५ हे मिळुन आले पोलीसांनी सदर वाहन थांबवुन त्याची तपासणी केली असता टिप्पर मध्ये ४ ब्रास रेती मिळुन आली. वाहन चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असता पंकज पुडलीक जांभुळे,वय २८ वर्षे,रा. पुयारदंड,ता.चिमुर,जि. चंद्रपुर अशी माहीती प्राप्त झाली. त्याला वाहन मालकाबाबत विचारपुस केली असता मोरेश्वर लहुजी चुटे, वय ४० वर्षे, रा.नांद, ता.भिवापर,जि. नागपुर असे नाव समजले.नमुद वाहन चालकाला परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले. पोलीसांनी पंचासमक्ष १) ३ वाहना मधुन २० ब्रास रेती किंमती १,००,०००/- रूपये आणि २) वाहन क्र एम.एच ४९ सी.एफ ९३५७ किंमती ३०,००,०००/- रूपये, ३) वाहन क्र एम.एच ४० सी.डी ४८२४ किंमती ३०,००,०००/-रूपये, ४) वाहन क्र. एम.एच ४० बीएल ५६४५ किंमती २०,००,०००/- रूपये, असा एकुण ८१,००,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.नमुद वाहन चालक आणि मालक आरोपीतांवर पोस्टे भिवापुर येथे कलम ३०३(२),४९ भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सह कलम ४,२१ खाण खनिज अधिनियम, सह कलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम सह कलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये ३ गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपी चालकांना अटक करण्यात आले आहे.