अवैध रेती उत्खनन थांबवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा प्रवीण उपासे यांचा इशारा

अब्दुल कदीर बख्श ( हिंगणघाट )
हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर ( बाई ) व दारोडा येथील नदी घाटावरून मागील अनेक महिन्यापासून अवैध रेती उत्खनन सुरु असून पोकलंडच्या सहाय्याने अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होतं असून रोज शंभरावर टिप्पर भरून रेती बाहेर जातं असूनही आजवर प्रशासना कडून कोणतीही कारवाई होतं नसल्याने तहसीलदार हिंगणघाट यांच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वर्धा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उपासे यांनी जिल्हाधिकारी यांचे नावाने लिहिलेल्या व उपविभागीय अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून दिलेला आहे. प्रवीण उपासे यांनी निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या टिप्परद्वारे रेती उचलून लाखो रुपयाचा महसूल बुडत असतांना प्रशासन मात्र ठिम्म बसून आहेत. प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा अवैध व्यवहार सुरु असून हें करणारे कोण व्यक्ती आहेत याची प्रशासनाला चांगली जाणीव आहे. परिसरातील गावकऱ्यांचा याला प्रचंड विरोध असूनही हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने एखादे वेळी जन असंतोष निर्माण होऊ शकतो व त्यातूनच बीड सारखी घटना होऊ नये यासाठी महसूल प्रशासनाने वेळीच जागरूक राहून या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी वर्धा यांच्या नावाने लिहिलेले निवेदन देण्यात आले असून यावेळी शिष्टमंडळात प्रवीण उपासे यांच्या सोबत सर्वश्री धर्मपाल ताकसांडे, गुणवंत कोठेकर, कपिल रेवतकर, राहुल कोळसे, चेतन वैरागडे, सागर वाघमारे, प्रवीण भाईमारे,बिट्टू श्रावणे, नाथ ठोंबरे, दादू कटारे, साहिल रघाटाटे, विशाल पंडित, पवन कटारे, सुरज वाघमारे, कुणाल बोबाटे, आशिष डंभारे, मिलिंद डफ अण्णा मोरे इत्यादी उपस्थित होते.